वर्गातल्या एका कोपर्यात
गुपचूप बसून राहायचं असतं
सगळ्यांचे ग्रुप जमल्यावर
आपल्या सारख्यांना शोधायचं असतं
गुपचूप बसून राहायचं असतं
सगळ्यांचे ग्रुप जमल्यावर
आपल्या सारख्यांना शोधायचं असतं
वर्गातल्या एखाद्या मुलीला
आपली 'ड्रीमगर्ल' मानायचं असतं
सर्वांच्या नजरा चुकवून तिला
लांबून फक्त बघायचं असतं
'रोझ डे', 'व्हेंलेनटाईन डे' ला
वेगवेगळ प्लॅनिंग करायचं असतं
आणि रिकाम्या हातांनी जाऊन
रिकाम्या हातांनी परतायचं असतं
मित्रांकडून ट्रेनिंग घेऊन
तिच्याशी थोडं बोलायचं असतं
कुणी दुसर्याने तिला पटवल्यावर
वाया गेली म्हणून सोडायचं असतं
स्वतःहून बोलायला आणली कुणी
तरी अभ्यासाचं बोलायचं असतं
आणि नाव ही नाही विचारलं म्हणून
स्वतः वर चिडायचं असतं
पण आपण लाईन मारत राहावी
स्वतः च्या जगात धुंद राहावं
कुणी बघत नसलं तरी
रोज 'छावा' बनून येत राहावं